Saturday, January 9, 2010

वाटते सानुली


या कविता मी लहान पणापासून बाबांकडून ऐकत आलो आहे  - सगळ्याचे कवी मला माहित नाहीत आणि सर्व कविता मला जशा पाठ आहेत तशा लिहिल्या आहेत. जर कोणाला कवीचे नाव माहिती असेल किंवा कवितेत काही चूक झाली असेल तर जरूर कळवावे


वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
कधी हळू थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट
लावूनी अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परी जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशा-दिशांतून फिरता उधळून द्यावा
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भूळभूळ तिरी
वेळूच्या गुंजी वाजवूनी अलगुज
कणसांच्या कानी सांगावे हितगुज
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा


23 comments:

  1. वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
    घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

    कधी बाजारी कधी नदीच्या काठी
    राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
    हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
    कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

    लावून अंगुली कलिकेला हळुवार
    ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
    परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
    तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

    गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
    झुळ्झुळ झर्‍याची पसरावी चौफेर
    शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
    खुलवीत मखमली तरंग जावे गात

    वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
    कणसांच्या कानी सांगावे हितगूज
    शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
    गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

    दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
    टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
    स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
    घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

    ReplyDelete
    Replies
    1. लहानपणीची आठवण आली...!
      सुंदर कविता..

      Delete
  2. दामोदर अच्युत कारे यांची वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे हि कविता आहे.

    ReplyDelete
  3. आमच्या शाळेत ही कविता सहाव्या वर्गात शिकवली होती, आणि त्या वेळी फारच कठीण वाटली होती.

    ReplyDelete
  4. Thanks Nibhatish. Mi hya page var barechda yeoon hi kavita vaachato. Manaala kharach shaanti milte

    Sachin Ranade

    ReplyDelete
  5. आम्हाला ४थि मध्ये होती

    ReplyDelete
  6. खुप छान कविता आहे. खरच वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे

    ReplyDelete
  7. छान कविता. मला पाठ होती. आता विसरलो.

    ReplyDelete
  8. छान कविता. मला पाठ होती. आता विसरलो.

    ReplyDelete
  9. Chan aahe..khup chan.
    Wat t Ki nisargachya sanidhyat nighun jawa��

    ReplyDelete
  10. खुप छान कविता आहे तिसरीत असताना शिकलो होतो

    ReplyDelete
  11. सुंदर कविता आहे. बालमानातील कुतूहल सुरेख शब्दात रेखाटले आहे.

    ReplyDelete
  12. या कवितेचा पूर्ण अर्थ मिळेल का अथवा कवी यांचा संपर्क क्रमांक मिळेल का ???

    ReplyDelete
  13. मला 4th मध्य असताना होती आम्हाला . आणि मला पाठ सुद्धा होती... खूप छान आहे....I like it

    ReplyDelete
  14. मला वाटते की ही कविता आम्हाला तिसरीला होती आणि पाठ होती आणि विशेष म्हणजे वर्गातील काही गोड मुलींनी या कवितेला गोड चाल लावली होती....... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....

    ReplyDelete
  15. Mazya Lahanpanachi athvan hi Kavita Mazya mammini 3ri cha nikal laglywar unhadyachya suttyanmadhe sikhwli Hoti..hi Kavita mala ekdm tond path Hoti hi Kavita mhnatana ajahi Mazya dolyat Pani yet..itke Varsh zale Tari punha punha aikaychi iccha hote

    ReplyDelete