या कविता मी लहान पणापासून बाबांकडून ऐकत आलो आहे - सगळ्याचे कवी मला माहित नाहीत आणि सर्व कविता मला जशा पाठ आहेत तशा लिहिल्या आहेत. जर कोणाला कवीचे नाव माहिती असेल किंवा कवितेत काही चूक झाली असेल तर जरूर कळवावे.
बघ आई आकाशात सूर्य हा आला
बघ आई आकाशात सूर्य हा आला
पांघरून अंगावर भरजरी शेला
निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी
सोनियेच्या लाविलेल्या आत झालरी
केशराचे घातले हे सडे भूवरी
त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी
डोंगराच्या आडुनी हा डोकावी हळू
आणि फुले गुलाबाची लागे उधळू
पाखरांच्या संगे याची सोबत छान
गाती बघ कशी याला गोड गायन
मंद वारा जागवितो साऱ्या जगाला
म्हणत असे उठा उठा मित्र हा आला
No comments:
Post a Comment