Monday, January 4, 2010

श्रावण बाळ आणी दशरथ राजा


या कविता मी लहान पणापासून ऐकत आलो आहे बाबांकडून - सगळ्याचे कवी मला माहित नाहीत आणि सर्व कविता मला जशा पाठ आहेत तशा लिहिल्या आहेत. जर कोणाला कवीचे नाव माहिती असेल किंवा कवितेत काही चूक झाली असेल तर जरूर कळवावे.

दशरथ राजाच्या हातून जेंव्हा चुकून श्रावण बाळाला बाण लागतो - त्याचे वर्णन करणारी हि कविता

शर आला तो धावुनी आला काळ
विव्हहळला   श्रावण बाळ
आ आई ग. दीर्घ फोडुनी हाक
तो पडला जाउनी झोक
हे राजाच्या श्रवणी पड़ता कानी
हृदयाचे जाले पाणी
त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुज्या नाशाला
मी पापी कारण बाळा
मग कळवळुनी न्रुपास बोले बाळ
कशी तुम्ही साधली वेळ
मम  म्हातारे माय-बाप तान्हेले
तरु खाली असती बसले
कावड त्यांची घेउन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरुनी झारी
जो परत फिरे तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला
मी एकुलता पुत्र कसा हा घाला
मजवरती अवचित आला
या वृद्धपणी मीच एक आधार
सेवेस आता मुकणार

काळीज त्यांचे फाटून शोकावेगे
ते येतील माझ्या मागे

आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका काही
ही विनंती तुमच्या पायी
मज माघारी करा तुम्ही सांभाळ
होऊनीया श्रावण बाळ

परी झाकुनी हे सत्य कसे राहील
विधिलेख न होई फोल
घ्या झारी ही जातो त्याचा तोल

लागला जावया खोल
सोडिला श्वास शेवटला
तो जीव-विहग फडफडला
तनुपंजर सोडुनी गेला
दशरथ राजा रडला धाई धाई
अडखळला ठाई ठाई

3 comments:

  1. Poet is G.H.PATIL.
    You will get original text in this link. Best wishes.
    Nagarkar kaka
    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/balbharati_edition2_march_2012_lr.pdf

    ReplyDelete
  2. फारच सुंदर कविता! ग. ह. पाटीलांची 'निंबोळ्या' अवश्य वाचावी. तिच्यात वात्सल्य रसाचा परमोत्कर्ष झाला आहे.

    मला आठवल्या त्या दुरुस्त्यांसह पुनर्लेखन करीत आहे-

    शर आला तो धावुनी आला काळ
    विव्हळला श्रावण बाळ
    हा आई गे. दीर्घ फोडुनी हाक
    तो पडला जाउनी झोक
    ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
    हृदयाचे जाले पाणी
    त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
    शोकाकुल झाला नृमणी
    आसवे आणुनी नयनी
    तो वदला हा हंत तुज्या नाशाला
    मी पापी कारण बाळा
    मग कळवळुनी न्रुपास बोले बाळ
    कशी तुम्ही साधली वेळ
    मम म्हातारे माय-बाप तान्हेले
    तरु खाली असती बसले
    कावड त्यांची घेउन मी काशीला
    चाललो तीर्थयात्रेला
    आणाया निर्मळ वारी
    मी आलो या कासारी
    ही लगबग भरुनी झारी
    जो परत फिरे तो तुमचा शर आला
    या उरात रुतुनी बसला
    मी एकुलता पुत्र कसा हा घाला
    मजवरती अवचित आला
    या वृद्धपणी मीच एक आधार
    सेवेस आता मुकणार

    काळीज त्यांचे फाटून शोकावेगे
    ते येतील माझ्या मागे

    आहेत अंध ते दोन्ही
    दुर्वार्ता फोडू नका ही
    ही विनंती तुमच्या पायी
    मज माघारी करा तुम्ही सांभाळ
    होऊनीया श्रावण बाळ

    परी झाकुनी हे सत्य कसे राहील
    विधिलेख न होई फोल
    घ्या झारी ही जातो त्याचा बोल
    लागला जावया खोल
    सोडिला श्वास शेवटला
    तो जीव-विहग फडफडला
    तनुपंजर सोडुनी गेला
    दशरथ राजा रडला धाई धाई
    अडखळला ठाई ठाई

    ReplyDelete